Advertisement

बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यांना यलो अलर्ट

प्रजापत्र | Thursday, 18/11/2021
बातमी शेअर करा

पुणे दि.18 नोव्हेंबर – कालपासून राज्यात काही ठिकाणी पुन्हा पाऊस होत आहे. शक्यतो या दिवसात कधी पाऊस होत नाही. मात्र, हवामानात बदल होत असल्याने असे घडत आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात चार ते पाच दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. मराठवाड्यातील बीड , उस्मानाबाद,लातूर,नांदेड जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

 

अंदमानच्या समुद्रात मागील आठवड्यात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर झाला आहे. राज्यात सध्या अनेक ठिकाणी ढगाळ हवामान आहे. त्यामुळे थंडी जवळपास गायब झाली आहे. काही जिल्ह्यात पाऊसही होत आहे.

 

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई-ठाणे परिसरात एक ते दोन दिवस पाऊस होईल असा अंदाज आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोकणातील काही जिल्ह्यात पुढील काही दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे.

 

पुणे,नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांत सुद्धा 5 दिवस पाऊस होईल, अशी शक्यता आहे. नंदूरबार, धुळे जिल्ह्यातील काही ठिकाणी पाऊस होईल. मराठवाड्यातील बीड,नांदेड, लातूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

असा आहे येलो अलर्ट

18 नोव्हेंबर रोजी ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर, नाशिक, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

19 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

20 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर, नाशिक, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, लातूर, नंदुरबार, नांदेड जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

 

21 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर, नाशिक, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement