Advertisement

बीड ग्रामीण हद्दीत पकडला गुटखा

प्रजापत्र | Tuesday, 16/11/2021
बातमी शेअर करा

बीड दि.16 (प्रतिनिधी) : जिल्ह्यात गुटख्याचा धंदा तेजीत असून स्थानिक पोलिसांचे याला आशिर्वाद असल्याचे चित्र आहे. मात्र केज उपविभागाचे प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने थेट बीड ग्रामीण हद्दीत गुटख्यावर कारवाई केल्याची माहिती आहे. या पथकाने मोठ्या प्रमाणावर गुटखा जप्त केल्याचे सुत्रांनी सांगितले.

 

 

केज उपविभागाचे प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांनी अवैध धंद्यांविरोधात मोहिम उघडली आहे. वाळू तस्करी विरुद्ध कारवाई केल्यानंतर थेट गेवराईपर्यंत शोध घेणार्‍या कुमावत यांनी गुटखा माफियांनाही लक्ष केले आहे. पंकज कुमावत यांच्या पथकाने बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या इमामपूर परिसरात कारवाई करुन मोठ्या प्रमाणावर गुटखा जप्त केल्याची माहिती आहे. या प्रकरणात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. मात्र गुटख्याच्या धंद्यातील एका बड्या माशाच्या हस्तकावर पोलीसांची नजर असल्याची माहिती आहे. यापूर्वीही पंकज कुमावत यांच्या पथकाने अंबाजोगाई उपविभागात गुटख्यावर कारवाई केली होती.

Advertisement

Advertisement