उत्तर महाराष्ट्रातील मोठा नेता म्हणजे एकनाथ खडसे यांच्या नावाचीच सर्वाधिक चर्चा आहे. शिवाय एकनाथ खडसे मोठ्या काळापासून भाजपवर नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे एकनाथ खडसेच तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर नाहीत ना अशा चर्चांना उधाण आलं आहे.गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसेंनी आपली अस्वस्थता वांरवार व्यक्त केली आहे. मध्यंतरीच्या काळात त्यांनी केलेली व्यक्तव्ये आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली उत्तरं पाहता एकनाथ खडसे आता निर्णायक टप्प्यापर्यंत आलेले आहेत असं दिसतं. त्यांना पक्षात घेतल्यावर जळगाव जिल्ह्यातील समीकरणं कशी बदलणार आहेत? त्याचे परिणाम कसे होणार आहेत याचा आढावा घेण्यासाठीच तिथल्या नेत्यांना मुंबईत बोलावून शरद पवार त्यांच्याशी चर्चा करतील. तसंच खडसेंना पक्षात घेतल्यावर किती फायदा होईल याचा विचार करुन निर्णय घेतला जाईल. विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा होती. परंतु त्यांना जे अपेक्षित होतं, ते देण्यासारखं आमच्याकडे काही नाही,असं तेव्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आता त्यापुढे एकनाथ खडसे आपल्या मागण्यांमध्ये तडजोड करण्यास तयार आहे की, खडसेंना अपेक्षित असलेलं देण्यास राष्ट्रवादी तयार आहे, यावर चर्चा होईल.
प्रजापत्र | Wednesday, 23/09/2020
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा