Advertisement

महिलेनेच शिक्षिकेला फसवले दोन लाखाला

प्रजापत्र | Wednesday, 03/11/2021
बातमी शेअर करा

बीड दि.3 – क्रेडिट कार्डाला लागणारे सर्व शुल्क बंद करण्याचे आमिष दाखवून भामट्या महिलेने शिक्षिकेला ‘एनी डेस्क’ नावाचे मोबाइल ऍप डाऊनलोड करायला लावले. नंतर ऍपच्या माध्यमातून शिक्षिकेच्या बँक खात्यातून १ लाख ९५ हजार रुपये काढून घेतल्याची घटना बीडमध्ये उघडकीस आली. जयश्री दत्तात्रय माथेसूळ असे फसवणूक झालेल्या शिक्षिकेचे नाव आहे.

               माथेसूळ यांना ९ ऑक्टोबर रोजी पूजा नामक महिलेचा कॉल आला. तुमच्या क्रेडिट कार्डला लागणारे सर्व शुल्क बंद करून देते, असे आमिष तिने दाखवले. त्यासाठी तिने क्रेडिट कार्डचा नंबर घेतला आणि ‘एनी डेस्क’ नावाचे मोबाइल ऍप इन्स्टॉल करण्यास सांगितले. त्यानंतर विविध मेसेज टाइप करून पाठवण्यास सांगितले. तेवढ्यात त्यांचा मुलगा तिथे आला आणि त्याने आईच्या हातातून फोन घेऊन बंद केला. त्यानंतर शुक्रवारी (दि. २९) ऑनलाइन मोबाइल खरेदी करताना कार्डची लिमिट संपल्याचा मेसेज आल्याने त्यांनी खाते तपासले तेव्हा त्यातून १ लाख ९५ हजार रुपये काढून घेतल्याचे लक्षात आले. याप्रकरणी जयश्री माथेसूळ यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Advertisement

Advertisement