Advertisement

लडीच्या आणि मोठ्या आवाजाच्या फटाक्यांवर बंदी विक्री केली तर परवाना होणार रद्द , पोलिसांवरही कारवाई

प्रजापत्र | Monday, 01/11/2021
बातमी शेअर करा

बीड : दिवाळीच्या धामधूम सुरु असतानाच फटाक्यांच्या वापरासंदर्भाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना आता राज्य शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार लडीचे आणि मोठा आवाज असणारे फटाके वापरण्यावर आणि विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली असून असे फटाके विक्री झाले तर विक्रेत्याचा परवाना रद्द करण्यासोबतच संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. 
देशात फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने लडीच्या तसेच मोठ्या आवाजाच्या फटाक्यांवर बंदी घातलेली आहे. बॉम्ब, जास्त आवाज करणारे फटाके तसेच लडीचे सारे प्रकार यांच्या उत्पादन आणि विक्रीवर बंदी असतानाही अशा फटाक्यांची विक्री सर्रास होत असल्याने आता राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकारी आणि एसपींना स्पष्ट निर्देश दिले आहेत. 
जे विक्रेते असे फटाके, बंदी घातलेली असतानाही विकतात त्यांच्यावर तातडीने कारवाई करा, त्यांचे परवाने रद्द करा असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सायलेंट झोनमध्ये ज्यात दवाखाने, शाळा , धार्मिक स्थळे यांच्या १०० मित्राच्या परिसरात कोणतेही फटाके वाजविण्यास बंदी घालण्यात आली आहे. ज्या ठिकाणी असे फटाके वाजविले जातील किंवा बंदी असलेले फटाके वाजविले किंवा विकले जातील तेथील ठाणेप्रमुखांवर देखील कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

Advertisement

Advertisement