बीड दि.२८ (प्रतिनिधी)-बीडच्या शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्तेचा नवा आदर्श निर्माण केलेल्या युनिक अकॅडमीने सीईटी परिक्षेत पुन्हा एकदा यशाचा झेेंडा रोवला आहे. क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी या परिक्षेत चांगले गुण मिळवले असून याबद्दल विद्यार्थी व पालकांचा सत्कार क्लासेसचे संचालक इंजि.हर्षल केकान यांच्या हस्ते करण्यात आला.
सीईटी परिक्षेचा निकाल बुधवारी (दि.२७) रोजी जाहीर झाला. यामध्ये क्लासेसच्या मानसी खोड (९६.२२टक्के,पीसीएम टॉपर), अमेय रायके (९६.८५ टक्के, मॅथमॅटीक्स टॉपर), आदिती सुभेदार (९५.३६ टक्के), अक्षयराज भवर (९४.०३टक्के),ओम पाखरे (९४.४७टक्के), माहेश्वरी जाधव (९३.३५टक्के ),सुमित ढगे (९३.६४ टक्के),वैष्णवी चव्हाण (९१.४९ टक्के),निखील गर्कळ (९१.५३टक्के),गोपाल बडगे (९१.११टक्के), आदित्य सिरसट (९३.१२टक्के),अनघा पवार (९२.३७ टक्के), उमेश ढोले (९० टक्के), मानसी मधुरकर (८९.३९ टक्के), क्षितीजा तिपाले (८५.४५ टक्के), यशवंत जायभाय (८७.३२टक्के), विवेक सपकाळ (८२.८३ टक्के), कार्तिक लड्डा (८२.२५ टक्के), सार्थक तेरखेडकर (८३.४१ टक्के), हर्षल कासट (८५.१५ टक्के), विश्वजीत वाघ (८७.२३ टक्के ), आशिष नागरगोजे (८३.५५ टक्के) या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. याबरोबरच इतर विद्यार्थ्यांनीही चांगले गुण मिळवले आहेत. या गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार क्लासेसचे संचालक इंजि.हर्षल केकान यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी केकान सर यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सत्कार सोहळ्यास विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करा