बीड-बीड जिल्ह्यातील शेतीचे संपूर्ण नुकसान झाले आहे. शेतकरी नेस्तनाभूत झाला आहे. अशावेळी अजूनही सरकार शेतकऱ्यांना मदत करीत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना काळी दिवाळी करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळी पुर्वी मदत मिळाली नाही तर आम्ही दिवाळी साजरी करणार नाही अशी घोषणा गेवराईचे आ.लक्षमण पवार यांनी केली. तसेच शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी भाजप लढा तीव्र करणार असल्याचे ते म्हणाले.
भाजपच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत आ.लक्षमण पवार यांनी पंचनामे घरात बसून झाले आहेत, प्रशासन नुकसान लपवित आहे असाही आरोप केला. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकर मिळणे अपेक्षित होते, मात्र अजूनही मदत मिळत नाही. २ वर्षात कोणतीच मदत नाही. त्यामुळे आता भाजप लढा अधिक तीव्र करेल. मी स्वतः उपोषण करेल असेही आ.पवार म्हणाले.या पत्रकार परिषदेला प्रवक्ते राम कुलकर्णी, देविदास नागरगोजे, भगिरथ बियाणी, शांतिनाथ डोरले यांची उपस्थिती होती.
प्रजापत्र | Saturday, 23/10/2021
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा