बीड : विविध सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे कार्यक्रम आता जाहीर होवू लागले आहेत. बीड जिल्ह्यातील बीड आणि पाटोदा आणि अंबाजोगाई या तीन बाजार समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरणाने जाहीर केला आहे. या तिन्ही बाजार समित्यांसाठी 17 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. बीड बाजार समिती आतापर्यंत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर गटाकडे राहिलेली आहे. तर पाटोदा बाजार समितीवर रामकृष्ण बांगर गटाचे वर्चस्व राहिलेले आहे. मात्र आता या तिन्ही बाजारसमित्यांसाठी चुरशीची निवडणुक होईल असे चित्र आहे.
राज्यातील विविध सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरणाने सुरु केली आहे. ज्या बाजार समित्यांची मुदत संपलेली आहे त्या ठिकाणी निवडणूक कायर्ंक्रम घेण्याचे आदेश सहकार प्राधिकरणाने दिले आहेत. त्यानूसार आता बीड जिल्ह्यातील बीड आणि पाटोदा, अंबाजोगाई या बाजार समित्यांसाठी पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे. त्यासाठी मतदार याद्या जाहीर करण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरणाने दिले आहेत. त्यानूसार आता या बाजार समित्यांसाठी 6 डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी केली जाणार असून 17 जानेवारी रोजी मतदान होणार आहे.
बातमी शेअर करा