अंबाजोगाई-बनावट शिक्का व आरटीओंची बनावट स्वाक्षरी तयार करून ट्रान्सफर चे कागदपत्रे आरटीओ कार्यालयात सादर केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
येथील आरटीओ कार्यालयात गाडीचे ट्रान्सफर करण्यासाठी आरटीओ कार्यालयातील स्कॅनिंग शिक्का, आवक-जावक तारखेचा शिक्का व आरटीओंची स्वाक्षरी हे सर्व बनावट पद्धतीने तयार करून कार्यालयात गाडी ट्रान्सफर करण्यासाठी कागदपत्रे सादर केली होती. असे बनावट पद्धतीने तयार केलेले चार गाड्यांचे ट्रान्सफर कागदपत्रे आढळून आली. बनावट पद्धतीने कागदपत्रे तयार करुन कार्यालयाची फसवणूक केल्याप्रकरणी कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दत्ता सांगोलकर यांच्या आदेशावरून कनिष्ठ लिपिक संजय शेळके यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नेहरकर पुढील तपास करीत आहेत.
प्रजापत्र | Wednesday, 13/10/2021
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा