राज्यातील ६ जिल्ह्यांमध्ये ५ ऑक्टोबरला झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीची आज (६ ऑक्टोबर) मतमोजणी होत आहे. मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या ही पोटनिवडणूक सर्वच पक्षांसाठी महत्त्वाची असल्यानं सर्वांनीच ताकद लावलेली दिसली. त्यामुळे या पोटनिवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. नागपूर, पालघर, धुळे, नंदूरबार, अकोला आणि वाशिमच्या जिल्हा परिषदेसाठी मतमोजणी होत आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण ८५ जागांचा आणि १४४ पंचायत समितीच्या जागांचा निकाल घोषित होत आहे.कोरोना संसर्ग आणि ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे लांबणीवर पडलेल्या महाराष्ट्रातील या ६ जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुकीत आतापर्यंत ‘काटे की टक्कर’ होताना दिसत आहे.
जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत कोणाला किती जागा?
जिल्हानिहाय जिल्हा परिषदेच्या जागा-नागपूर – १६,धुळे – १५,अकोला – १४,वाशिम – १४,नंदूरबार – ११,पालघर – ०२
जिल्ह्यानिहाय पंचायत समिती जागा-नागपूर – ३१,धुळे – ३०,अकोला – २८,वाशिम – २७,नंदूरबार – १४,पालघर – १४
नंदूरबार-नंदुरबारमध्ये जिल्हा परिषदेच्या ११ गटांसाठी आणि पंचायत समितीच्या १४ गणांवरील उमेदवारांच्या राजकीय भविष्याचा निकाल घोषित होत आहे.
अकोला-अकोला जिल्ह्यात १४ जिल्हा परिषद जागा आणि २८ पंचायत समिती गणात पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीतील मतदारांची संख्या ३ लाख ७१ हजार ६९० इतकी होती. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १४ निवडणूक विभागांमध्ये ६८ उमेदवार तर पंचायत समितीच्या २८ गणांमध्ये ११९ उमेदवार निवडणूक रिंगणात होत.
वाशिम-वाशिम जिल्हा परिषदेच्या १४ गटासाठी तर पंचायत समितीच्या २७ गणासाठी निवडणूक झाली. जिल्हा परिषदेच्या १४ गटासाठी ८२ उमेदवार निवडणूक मैदानात होते. पंचायत समितीच्या 27 गणांसाठी 135 उमेदवार रिंगणात होते.“शेतकऱ्याच्या विरोधात जाणार त्याचा पराभव होणार”, अमरावती जिल्हा बँक विजयानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रियाधुळे आणि नंदूरबार-खान्देशात २५ गट, ४१ गणांसाठी मतदान झालं. धुळे आणि नंदुरबार दोन्ही जिल्ह्यातील २५ गटांसाठी ८३ उमेदवार तर ४१ गणांसाठी १११ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.