केंद्र सरकारकडून मंगळवारी लोकसभेत कृषी क्षेत्रातील सुधारणांशी संबंधित तीन विधेयकं सादर करण्यात आली. कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी ही विधेयकं मांडली. यामध्ये जीवनावश्यक वस्तू (सुधारणा) विधेयक २०२० चाही समावेश होता. लोकसभेत विधेयकावर चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना यावेळी विधेयकाचे आम्ही समर्थन करीत नाही असं स्पष्ट केलं.
सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत लोकसभेतील आपल्या भाषणाची व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे. यावेळी त्यांनी सांगितलं आहे की, “लोकसभेत जीवनावश्यक वस्तू (सुधारणा) विधेयक २०२० संदर्भातील चर्चेत सहभाग घेतला. यावेळी या विधेयकाच्या अनुषंगाने असलेले आक्षेप सभागृहात मांडले. या विधेयकाचे आम्ही समर्थन करीत नाही”.
बातमी शेअर करा