Advertisement

शेतकऱ्यांना दिलासा , पीक विम्यासंदर्भाने काय आहे खबर ?

प्रजापत्र | Wednesday, 29/09/2021
बातमी शेअर करा

बीड- बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीने हैराण झालेल्या शेतकऱ्यांसाठी आता काहीसा दिलासा देणारी खबर आहे. मागील वर्षीच्या पीक विम्यापासून वंचित शेतकऱ्यांसाठी तब्बल ९३६ कोटींचा पीक विमा मंजूर झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विमा कंपनीचे अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांची बैठक झाली असून यात ९३६ कोटीच्या विमा नुकसान भरपाईला मंजुरी देण्यात आली आहे. याचे आदेश एक दोन दिवसात अपेक्षित आहेत. धनंजय मुंडे आणि अमरसिंह पंडित यांनी यासंदर्भात बैठकीत पाठपुरावा केला होता.
बीड जिल्ह्यात मागील हंगामात (१९-२० ) लाखो शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. मात्र विमा कंपनीने मोजक्याच शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई दिली होती. त्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर आंदोलने सुरु होती. किसान सभेने तर पुण्यातही आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. याला बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे, माजी आमदार अमरसिंह पंडित यांची उपस्थिती होती. या बैठकीत विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मागील वर्षीचा पीक विमा देण्याला संमती दाखविली असून तब्बल ९३६ कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती आहे. सध्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना यामुळे काहीसा आधार मिळणार आहे. 

Advertisement

Advertisement