घाटनांदूर (प्रतिनिधी) : अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर व येथील परिसरात गेल्या चार दिवसांपासून रात्री व दिवसा सतत मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे येथील काढणीला आलेली पिके पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणारे लोकप्रतिनिधी आणि निसर्ग दोघेही शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
घाटनांदूर, गिरवली, पूस, जवळगाव, , मुरंबी धरणाच्या नदीला आला पूर मुरंबी सह .लिमगाव बर्दापूर रस्ता .बंद चोथेवाडी, साळुंकवाडी, चोपनवाडी भागात गेल्या चार दिवसांपासून मेघ गर्जनेसह मुसळधार पाऊस झाल्याने नदी, नाले,ओढे तुडुंब भरून वाहत आहेत; तर शेतांना तलावाचे स्वरूप आले आहे. सोयाबीन पीक काढणीच्या कामात सततच्या पावसाने मोठा व्यत्यय आला आहे. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांना मोठा फटका बसला होता. काढणीला आलेली पिके पाण्यात गेली आहेत ; आता फक्त शेतकरी मातीत जायचा बाकी आहे. हीच आर्त किंकाळी प्रत्येक शेतकऱ्याच्या काळजातून निघत आहे.
पावसाचा जोर अजूनही वाढतच आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास पाण्यात गेल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. सरसगट तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांनाना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
बातमी शेअर करा