Advertisement

धारुर तालूक्यात दोघे वाहून गेले

प्रजापत्र | Monday, 27/09/2021
बातमी शेअर करा

 

किल्लेधारूर दि. 27 सप्टेंबर - तालूक्यातील चिंचपूर येथील पुलावरुन दुचाकीवरुन जात असलेले दोघे वाहून गेले असून यातील एकाचा मृतदेह सापडला आहे तर दुसरा अद्याप बेपत्ता आहे.
 

धारुर तालुक्यात मोठ्या प्रमाणात जोरदार पाऊस कोसळत असून नदी, नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. तालुक्यातील अनेक गावांचा तालुक्याचा संपर्क तुटला आहे. यातच रात्री पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकीवरुन जाणाऱ्या दोघे जण वाहून गेल्याची घटना चिंचपूर रस्त्यावर घडली. ग्रामस्थांनी रात्री एकाचा मृतदेह शोधला असून दुसऱ्याचा शोध सुरु आहे.

धारुर ते चिंचपूर रस्त्यावर खारीचा पुल म्हणून ओळखला जाणाऱ्या ओढ्याला काल अतिवृष्टीमुळे पुर आलेला होता. रात्री या पुलावरुन केज (Kaij) तालुक्यातील उंदरी येथील महादेव सोणवने व उत्तम सोणवने आपल्या दुचाकी क्र. एम.एच. 44 एन. 7829 वरुन जात होते. परंतू पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकीसह दोघे वाहून गेल्याची घटना घडली आहे.

घटनास्थळी धारुर पोलिस (Police) व ग्रामस्थांनी रात्री मदतकार्य सुरु केले. सदरील पुल हा नेहमीच पावसात पाण्याखाली जातो. हा परिसर वाण नदीचे पाणलोटक्षेत्र असून खारी म्हणून ओळखला जातो. या ओढ्याला पाणी आल्यावर तासन् तास वाहतूक खोळंबते. घटनास्थळी सध्या मोठी गर्दी असून वाहून गेलेल्या एकाचा शोध सुरु आहे.

Advertisement

Advertisement