Advertisement

वैद्यकीय ची कोटा पध्दत रद्द झाल्याने आत्मक्लेश आंदोलन रद्द: चरखा

प्रजापत्र | Friday, 11/09/2020
बातमी शेअर करा

बीड (प्रतिनिधी)ः- वैद्यकीय पुर्व परीक्षेसाठी घटनाबाह्य प्रादेशीक आरक्षण अखेर शासनाने रद्द केले आहे. मराठवाड्या सारख्या मागास भागाच्या शैक्षणिक क्रांतीला चालना देणारा हा निर्णय घेतल्याबद्दल पालक, विद्यार्थी संघर्ष समितीच्यावतीने शासनाचे अभिनंदन करुन 17 सप्टेंबर 2020 रोजी म्हणजेच मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी पुकारलेले ‘आत्मक्लेष’ आंदोलन रद्द करण्यात आल्याची माहिती विद्यार्थी, पालक संघर्ष समितीच्यावतीने राजेंद्र चरखा यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. 

विद्यार्थी, पालक संघर्ष समितीने गेली तीन वर्ष 70/30 चा कोटा रद्द व्हावा यासाठीचा लढा मोठ्या जोमाने लढला. अनेक पातळीवर व विविध आंदोलने करुन शासनाचे लक्ष वेधून घेत विविध प्रकारचे आंदोलने केली. त्याच प्रमाणे न्यायालयीन लढा देखील दिला अखेर शासनाने याची दखल घेऊन मराठवाड्यातील विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने 70/30 कोटा रद्द व्हावा यासाठी मनोज फरके, डॉ. नेहरकर, डॉ. उध्दव घोडके, प्रशांत कोळपकर, राजेश भुसारी, ऍड. विशाल कदम, हावळे सर, दहिफळे आदींनी वेळोवेळी विविध आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवला होता. 

मराठवाड्यातील वैद्यकीय शिक्षण घेण्यास इच्छुक असणार्‍या विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने शासनाने 70/30 चा कोटा रद्द केल्याबद्दल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह सर्व पक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते यांचे विद्यार्थी, पालक संघर्ष समितीच्यावतीने आभार व्यक्त करण्यात येत आहेत. 

Advertisement

Advertisement