बीड दि.६ : बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख म्हणून भरत राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आले.
येथील स्थानिक गुन्हे शाखेतून पोलीस निरीक्षक भरत राऊत यांची नुकतीच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई येथे बदली झाली होती. बीड लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयातील उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे पाटील यांची बदली झाली होती. त्यांच्या जागी बीड येथे भरत राऊत यांची पदोन्नतीवर पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे बुधवारी (दि.6) आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक संजीव भोळे यांनी काढले आहेत.
बातमी शेअर करा