Advertisement

नगराध्यक्षांवर गुन्हा नोंद; धारुर शहर कडकडीत बंद

प्रजापत्र | Wednesday, 01/09/2021
बातमी शेअर करा

 

 

 धारूर दि.१ सप्टेंबर - काल दि.३१ मंगळवारी धारुर नगर परिषदेचे नगराध्यक्ष डॉ. स्वरुपसिंह हजारी यांच्या वर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून यानंतर शहरात एकच खळबळ उडाली. याचे पडसाद आज धारुर शहरात दिसून आले असून व्यापाऱ्यांनी बंद पाळत निषेध नोंदवला तर डॉक्टर्स  असोशिऐशन   खोटा गुन्हा रद्द करण्याची मागणी करत सेवा बेमुदत बंद करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

 

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि.३१अॉगस्ट  मंगळवार रोजी रात्री उशिरा धारुरचे नगराध्यक्ष डॉ. स्वरुपसिंह हजारी यांच्या वर धारुर पोलिस ठाण्यात  गुन्हा नोंद करण्यात आला. याबाबत नागरिकांत चर्चा होताच दुपारनंतर डॉ. हजारी यांच्या निवासस्थानी व पोलिस  ठाण्यात मोठा जमाव जमुन तणावपूर्णस्थिती निर्माण झाली होती. 

याप्रकारानंतर येथील व्यापारी संघटनेने हजारी हॉस्पिटलमध्ये कसलीही घटना घडलेली नसताना राजकीय द्वेशातून डॉ. हजारी यांची बदनामी करण्यासाठी चुकीची तक्रार देवून गुन्हा नोंद  करण्यात आला आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी करत व्यापारी महासंघाने आज दि.१ बुधवारी कडकडीत बंद पाळला आहे.

 

 

डॉक्टर असोशिऐशनची मागणी..
येथील डॉक्टर्स असोशिऐशनच्या वतीने वैद्यकीय व्यवसायिक तथा नगराध्यक्ष डॉ. स्वरुपसिंह हजारी यांच्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी केली आहे. सदरील प्रकरणाची कसलीही शहानिशा न करता पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून याचा निषेध म्हणून सर्व खाजगी दवाखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे असो.चे अध्यक्ष डॉ. मयुर सावंत यांनी निवेदनात म्हटलं आहे.

 

 

काय आहे प्रकार...
दि.३१ अॉगस्ट रोजी एका गर्भवती महिलेने उपचारासाठी गेले असता डॉ. हजारी यांनी विनयभंग केल्याची तक्रार दिली. या तक्रारी वरुन त्यांच्या विरुध्द विनयभंग  व ॲट्रासिटी   अंतर्गत भारतीय दंड संहिता  ३५४ (A), ३५४(B), अनु.जा. व अनु. ज. अधि.1989 च्या 3(1)(s), 3(1)(W) (I), 3(1)(W) (II) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विजय लगारे करीत आहेत.

 

 

 

Advertisement

Advertisement