Advertisement

काँग्रेसच्या बीड जिल्हाध्यक्षपदी राजेसाहेब देशमुख

प्रजापत्र | Thursday, 26/08/2021
बातमी शेअर करा

बीड : राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र राज्यातील बीडसह १४ जिल्हाध्यक्षांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. कॉंग्रेसच्या बीड जिल्हाध्यक्षपदी राजेसाहेब देशमुख यांची निवड करण्यात आली. यापूर्वी ही जबाबदारी राजकिशोर मोदी यांच्याकडे होती. 

गेल्या काही महिन्यांपासून भारतीय काँग्रेस पक्षात जिल्हाध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरु होत्या. अखेर राज्यातील 14 जिल्हाध्यक्षांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या असून यात बीड जिल्ह्याचाही समावेश आहे. जिल्हाध्यक्षपदी राजेसाहेब देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजेसाहेब देशमुख हे अंबाजोगाई तालुक्यातील मुळचे माकेगाव येथील असून ममदापूर पाटोदा गटाचे जिल्हा परिषद सदस्य आहेत. ते जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती होते. या काळात त्यांच्या कामकाजाचे सर्वत्र कौतुक झाले होते. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने ३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे यजमानपद घेऊन त्यांनी हे संमेलन यशस्वीरीत्या पार पाडले. शिक्षण सभापती असताना ते विविध तालुक्यातील शाळेत मुक्कामाला राहिले, अगदी पारावर बसून ग्रामस्थांच्या अडचणी समजून घेतल्या होत्या. या काळातील त्यांच्या अनोख्या कार्यपद्धतीचे सर्वांनाच आकर्षण होते. त्यांनी पंचायत समितीसह तालुका पातळीवर संघटनात्मक पदांवर काम केलेले आहे. या निवडीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी स्वागत केले असून राजेसाहेब देशमुख यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Advertisement

Advertisement