Advertisement

 गेवराई नगरपालिकेवरील कारवाईसाठी अमरसिंह पंडित उच्च न्यायालयात

प्रजापत्र | Thursday, 26/08/2021
बातमी शेअर करा

 

 बीड दि.२५ (प्रतिनिधी)-बीड जिल्ह्यातील गेवराई नगरपालिकेत झालेल्या गैर कारभारावर सुनावण्या झाल्या मात्र जिल्हाधिकार्‍यांनी कसलीच कारवाई केली नसल्याचे सांगत जिल्हाधिकार्‍यांना कारवाईचे आदेश देण्याची मागणी करीत माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पंडित यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली असून न्यायालयाने जिल्हाधिकार्‍यांना म्हणणे मांडण्याचे  आदेश दिले आहेत.
भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांचे वर्चस्व असलेल्या गेवराई नगरपरिषदेच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालेली आहे. स्वतः माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी गेवराई नगरपालिकेतील कामांच्या संदर्भाने बीडच्या जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली होती. यावर तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासमोर सुनावणी देखील झाली, मात्र त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे आत्या जिल्हाधिकार्‍यांना कारवाईचे आदेश द्यावेत अशी मागणी करणारी याचिका स्वतः अमरसिंह पंडित यांनीच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे. यावर न्या. एस. व्ही गंगापूरवाला आणि न्या. आर एन लड्डा यांच्यासमोर सुनावणी झाली असून न्यायालयाने या प्रकरणात जिल्हाधिकार्‍यांना आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणाची पुढील सुनावणी ३ सप्टेंबर रोजी होणार आहे.  

 

 

हेही वाचा... 
 २२ गुंडांना पोलीस अधीक्षकांनी केले हद्दपार          
http://prajapatra.com/2964

 

 

Advertisement

Advertisement