मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रविवारी (दि.8) रात्री 8 वाजता राज्यातील जनतेशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी ठाकरे यांनी येत्या आठ दिवसात हॉटेल, बार, प्राथना स्थळे, उघडण्यात येतील. जनतेची सहनशिलता संपत आली आहे हे मला माहिती आहे. आणखी थोडी कळ काढा आठ दिवसात निर्बंध शिथील होतील असे संकेत त्यांनी दिले
उद्या मुख्यमंत्री टास्क फोर्सच्या अधिकार्यांसमवेत चर्चा करणार असून यानंतर राज्यामध्ये निर्बंध शिथिल करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.प्रार्थनास्थळे, हॉटेल, बार उघडण्यात येतील, जनतेला निर्बंधांतून शिथिलता देऊ तसेच 15 ऑगस्टपासून मुंबईची लोकलसेवा सुरु होईल असे ते म्हणाले.ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.
त्यांना लोकलच्या सेवेचा लाभ घेता येणार आहे. येत्या दोन दिवसात डोस घेतलेल्या नागरिकांची माहिती माझ्यापर्यतं पोहचेल त्यानंतर १५ ऑगस्टपासून लोकलसेवा सुरु होईल असे ठाकरे यांनी म्हटले आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकलसेवेसाठी पास देण्यात येतील.यासाठी काही दिवसांचा कालावधी लागेल. त्यामुळे १५ ऑगस्टपासून लोकलची सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.ज्यांनी पास घेतले आहेत त्यांनाच लोकलच्या सेवेचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. महानगरपालिका आणि कोविनअॅपवरुन लाभार्थ्यांना डोसचे प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
हेही वाचा...
अखेर ज्योतिराम घुले भारताचे कर्णधार
http://prajapatra.com/2851