Advertisement

अखेर ज्योतिराम घुले भारताचे कर्णधार

प्रजापत्र | Sunday, 08/08/2021
बातमी शेअर करा

 

बीड दि.८ (प्रतिनिधी)-केज तालुक्यातील डोणगाव येथील ऊसतोड कामगाराचा मुलगा असलेल्या ज्योतिराम घुले यांची अखेर भारतीय (दिव्यांग) संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे.सध्या भारताचा संघ हैद्राबादमध्ये सराव सामने खेळत असून १२ सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध मालिकेला सुरुवात होणार आहे.या मालिकेसाठी ज्योतिराम घुले हे भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार असून त्यांची कर्णधारपदी निवड झाल्याने बीड जिल्हावासियांसाठी ही अभिमानाची बाब आहे. 

 

                  रविवारी (दि.८) हैद्राबादमध्ये भारतीय संघाच्या कसोटी,एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी कर्णधारपदाची निवड जाहीर करण्यात आली.यामध्ये एकदिवसीय मालिकेसाठी ज्योतिराम घुले यांच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली तर कसोटी मालिकेसाठी राकेश शर्मा (हरियाणा) आणि टी-२० साठी वसंत कुमार (तेलंगणा) यांच्याकडे जबाबदारी निश्चित करण्यात आली.बीड जिल्ह्याच्या खेळाडूची पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय पातळीवर निवड होत कर्णधारपदाची सूत्र देण्यात आल्याने ही अभिमानाची बाब आहे.सध्या त्यांच्या निवडीबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहेत. 

 

दैनिक प्रजापत्रचा अंदाज खरा ठरला 


दैनिक प्रजापत्रने गुरुवार (दि.५) च्या अंकात 'ज्योतिराम घुलेंची लागणार भारतीय संघाच्या कर्णधारपदी वर्णी' असा अंदाज वर्तविला होता.अखेर रविवारी त्यांची कर्णधारपदी वर्णी लागली असून दैनिक प्रजापत्रचा अंदाज खरा ठरला आहे. 

 

 

हेही वाचा... 
६५ वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या 
http://prajapatra.com/2849

Advertisement

Advertisement