बीड-राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी बीड जिल्ह्यात मात्र बाधितांची संख्या वाढत आहे.बुधवारी (दि.२८) ५००९ नमुन्यांमध्ये २४१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.तर ४७६८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.
मागील काही दिवसांपासुन बीड जिल्ह्यांत कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात वाढत असल्याचे चित्र आहे.तसेच महत्वाचे म्हणजे मराठवाड्यातील सर्वाधिक तपासण्या ही बीड जिल्ह्यात होत असल्याने रोजच्या सक्रिय रुग्णांचा आकडा १०० च्या आत येत नाही.आता तर कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या पुन्हा २५० च्या घरात जात असल्याचे चित्र आहे.बुधवारी अंबाजोगाई ५,आष्टी ४४,बीड ५०,धारूर १६,गेवराई २९,केज १०,माजलगाव ५,परळी १,पाटोदा ३३,शिरूर ३९,वडवणी ९ रुग्ण आढळून आले.
बातमी शेअर करा