Advertisement

आ. सुरेश धसांवर गुन्हा दाखल

प्रजापत्र | Saturday, 24/07/2021
बातमी शेअर करा

 

बीड-आ. सुरेश धस यांच्यासह ३० जणांनी चार वर्षापुर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणूकीत तुमच्यामुळे माझ्या पत्नीचा पराभव झाल्याचा राग मनात धरून माझे व्यवसाय सुरू असलेलेले हाॅटेल एका रात्रीत उध्वस्त केल्याची तक्रार माधुरी मनोज चौधरी या महिलेने पोलिसात दिली. सदर तक्रारीवरून आ. सुरेश धस यांच्यासह तीस जणांवर आष्टी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.धस यांना अटक न झाल्यास गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या बंगल्यासमोर रॉकेल ओतून घेणार असल्याचा इशारा मनोज चौधरी यांनी दिला आहे.
          याबाबत आष्टी पोलिसांत माधूरी चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की,स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आमदार सुरेश धस यांच्या पत्नीच्या विरुद्ध निवडणुकीत मी उभे असल्याचा राग मनात धरून आमदार सुरेश धस हे माझे पती मनोज चौधरी यांना सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने मानसिक त्रास देत होते.आता त्यांनी दि.१९ जुलै रोजी राञी आमचे नगर-बीड रोडवरील पांढरी हद्दीत वीस गुंठे कलेक्टर एनए असलेल्या जागेत हाॅटेल सुरू करून आमचा व्यवसाय सुरू होता. परंतु आमदार धस यांनी दहाच्या सुमारास येऊन या हाॅटेलवर बुलडोझर चालविले. त्यामुळे मी आणि माझे पती दोघेही येथे आलोत. परंतु आम्हाला दमदाटी करत दगडाने मारहाण केली.अशी तक्रार माधुरी चौधरी या महिलेने आष्टी पोलिसात दिल्याने आमदार सुरेश धस यांच्यासह सुधीर पठाडे, रमेश वांढरे, रविंद्र पठाडे, भूषण पठाडे, नितीन पोठरे, विलास भोगाडे, संभाजी भोगाडे, भरत वांढरे, बयाजी वांढरे, पका वांढरे, बंडू देशमुख, संतोष शेळके, रामा शेळके, भरत टाफरे, शिवाजी घुले, अंगद शिंदे, जिया बेग, अय्याज सय्यद, रमेश वांढरे, साधू हंबर्डे, वैभव वांढरे, विठ्ठल भोगाडे, भाऊ पठाडे, प्रकाश वांढरे, नवनाथ भोगाडे, रवि पठाडे, नाना शेळके, सुनिल रेडेकर, बाळू रोडे या तीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement