बीड दि.१८ (प्रतिनिधी)ः येथुन जवळच असलेल्या मांजरसुंबा घाटाजवळील हॉटेल हरियाणाला जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी यांनी भेटी दिल्यानंतर हे हॉटेल रविवारी विकेंड लॉकडाऊनमध्येही सुरू असल्याचे समोर आले. यानंतर या हॉटेलला तब्बल 25 हजारांचा दंड ठोठावण्यात आला. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, नामदेव टिळेकर यांनी कपीलधार येथे भेट देवून तेथील गर्दीही हटविली.
सध्या बीड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी अधिक प्रमाणात वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्यांनी मागील दोन दिवसापासून जिल्ह्यात निर्बंध कठोर केले आहेत. आष्टी, पाटोदा आणि गेवराईमध्ये दुकानांच्या वेळा 12.30 पर्यंत करण्यात आल्या असून विकेंड लॉकडाऊनसाठी पथकांची नेमणूक करण्यात आली होती. रविवारी विकेंड लॉकडाऊन असताना हॉटेल हरियाणा जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकार्यांच्या भेटीत उघडे असल्याचे समोर आले. यानंतर या हॉटेलला पाली ग्रामपंचायतच्या वतीने 25 हजारांचा दंड ठोठावण्यात आला. त्यानंतर तुषार ठोंबरे आणि नामदेव टिळेकर यांनी कपीलधार येथे भेट देवून पर्याटकांची गर्दी हटविली.