बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत नसल्याने जिल्हा प्रशासनाने तीन तालुक्यातील निर्बंध अधिक कडक केले आहेत .आष्टी,पाटोदा आणि गेवराई तालुक्यात यापुढे अत्यावश्यक सेवेची दुकाने फक्त सकाळी सात ते साडेबारा पर्यंत सुरू राहतील .राज्यातील बहुतांश भागातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना बीड जिल्ह्यातील आकडा मात्र सातत्याने वाढत आहे .विशेषतः आष्टी,पाटोदा आणि गेवराई या तीन तालुक्यातील आकडे चिंताजनक आहेत .अशावेळी नागरिकांना अनेक वेळा सांगूनदेखील कोणताही फरक पडत नसल्याचं चित्र आहे.
या सगळ्या गोष्टींचा विचार करून जिल्हा प्रशासनाने या तीन तालुक्यात अधिक कडक निर्बंध लागू केले आहेत .सकाळी सात ते साडेबारा या वेळेत या तीन तालुक्यातील दुकाने सुरू राहतील,त्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे व्यवहार करत येणार नाहीत .या काळानंतर जर कोणाला प्रवास करावयाचा असल्यास किंवा बाहेर पडायचे असल्यास परवानगीशिवाय बाहेर पडता येणार नाही .या नवीन निर्बंधांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिला आहे.