आष्टी- बीड, अहमदनगर महामार्गावर कासारी गावाजवळ नगरमार्गे जाणा-या पिकअप गाडीने त्याच दिशेने जात असलेल्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने एक महिला जागीच ठार तर एक तरूण मुलगा गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना दि.१४ जुलै रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास घडली हि माहिती कळताच सरपंच राम धुमाळ,उपसरपंच नवनाथ जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,कासारी गावाजवळील कडा कारखाना नजीक नेकनूर कडून पिंपरी चिंचवड कडे जात असलेल्या पिक- अप क्रमांक एम.एच.१४ एच.जी.०३८४ या गाडीने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने आष्टी येथून आपल्या सराटेवडगांव गावी दुचाकीवरून जात असलेल्या रुख्मिणी संतोष बोडखे (वय ४० वर्ष ) यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला तर मुलगा प्रविण बोडखे वय ( १८ वर्षे ) गंभीर जखमी झाला असून आष्टी येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
मयत रुख्मिणी बोडखे यांच्या पार्थिवावर आष्टी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन सराटेवडगांव येथील स्मशानभूमीत रात्री १० च्या दरम्यान शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, क्षेत्रातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या जाण्याने परिसरात शोककळा पसरली आहे.पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे. याबाबत आष्टी पोलिस ठाण्यात कलम २७९,३३८,३०४ अ भादवी नुसार राजू मच्छिंद्र बोडखे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पो.नि.सलिम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी धाव घेत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक एन.वाय. धनवडे, पोना.सिरसाठ यांनी पंचनामा करून पुढील तपास पो.कॉ.अनिल सुंबरे हे करत आहेत.