विजयसिंह बांगर यांच्याकडून प्रतिबंधात्मक उपायास प्रारंभ
पाटोदा-तालुक्यातील भायाळा गावात कोरोनाने प्रवेश केल्यानंतर गावप्रमुख असलेले सरपंच विजयसिंह (बाळा) बांगर यांनी कोरोनाला थोपविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.सध्या गावात प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यास सुरुवात झाली असून ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.
मागील आठवड्यात गावातील एका एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले होते.बाधितांच्या संपर्कातील अनेकांचे अहवाल निगेटिव्ह आले असून खबरदारीचा उपया म्हणून सरपंच विजयसिंह बांगर हे आरोग्याच्या उपाययोजना राबवित आहेत.सर्वप्रथम गावात सॅनिटायझर फवारणी करून निर्जंतुकीरण करण्यात आले.यासोबतच रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आर्सेनिक अल्बम गोळ्यांचेही मोफत वाटप करण्यात आले.त्यानंतर मंगळवारी (दि.१८) मालेगावचा सुप्रसिद्ध असलेल्या युनानी काढा ग्रामस्थांना मोफत देत त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात आली.सरपंचांच्या या अभिनव उपक्रमांमुळे ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणावर धीर मिळत असून त्यांच्या कार्याबद्दल आभार मानण्यात येत आहेत.