परळी वैजनाथ दि.१ - केज तालुक्यातील पिंपळगाव येथील एका शिक्षकाने रेल्वे समोर उडी मारून आत्महत्या केली आहे.चंद्रहास (पिंटू) उत्तम घोळवे या इसमाने बुधवारी दि.३० रोजी सायंकाळी ९ च्या सुमारास परळी जवळ रेल्वे समोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
                  चंद्रहास उत्तम घोळवे वय - ४५(रा.पिंपळगाव ता.केज) येथील व्यक्ती बुधवारी दुपारी तीन वाजता केज येथून स्वतःच्या चारचाकी गाडीतून निघून गेले. परिवारातील सदस्यांनी शोधाशोध सुरू केल्यानंतर मोबाईलचे लोकेशन परळी येथे दाखवले. परळीतील नातेवाईकांनी येथे शोधाशोध घेतला असता येथील धर्मापुरी रोड, सिमेंट फॅक्टरी जवळ गाडी सापडली. पुढे रेल्वे पटरीवर आत्महत्या केल्याचे दिसून आले. चंद्रहास यांच्या मागे आई,वडील, पत्नी, दोन मुले, एक भाऊ असा परिवार आहे.
          दरम्यान घोळवे यांनी सहा महिन्यांपूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता अशी माहिती आहे.
                                    
                                
                                
                              
