Advertisement

एटीएम मशिनमध्ये छेडछाड करून लांबविले साडेचार लाख

प्रजापत्र | Friday, 25/06/2021
बातमी शेअर करा

 

बीड :येथील एका एसबीआय बँकेच्या एटीएम मशीनच्या सॉफ्टवेअरमध्ये छेडछाड करून तब्ब्ल ४ लाख ४० हजार ५०० रुपयांची रक्कम लंपास केल्याचा प्रकार समोर आला असून याप्रकरणी अज्ञात भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

  बीड एसबीआय बँकेचे मुख्याधिकारी आनंदकुमार महेंद्रकुमार महातो यांनी फिर्यादीत नमूद केले आहे की, त्यांच्या जालना रोडवरील शाखेच्या खालीच बँकेचे एटीएम मशीन आहे. १४ जून रोजी नेहमीप्रमाणे बँकेच्या अधिकाऱ्यांनी एटीएम मधील रोख रक्कम तपासली असता मशीनच्या ॲडमिन बॅलन्स आणि रोख रकमेत ४ लाख ४० हजार ५०० रुपयांची तफावत आढळून आली. याबाबत त्यांनी तपास केला असता अज्ञात इसमाने संगणक आणि इतर साधनांचा वापर करून सदरील एटीएम मशिनच्या हार्डवेअरमध्ये एरर निर्माण केला  आणि पासवर्डचा गैरवापर करून त्याच्या आयडीएफसी बँकेच्या खात्यावर साडेचार लाखांची रक्कम ट्रान्सफर करून घेतली. सदर फिर्यादीवरून त्या अज्ञात इसमावर बीड शहर ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला.

Advertisement

Advertisement