Advertisement

  पाच लाखांसाठी विवाहित महिलेचा छळ जाचास कंटाळून महिलेची आत्महत्या

प्रजापत्र | Monday, 21/06/2021
बातमी शेअर करा

 

बीड ( प्रतिनिधी ):- लग्नात राहिलेली हुंड्याची पाच लाख रुपयांची रक्कम घेऊन का येत नाही या कारणावरून एका २० वर्षीय विवाहित महिलेचा छळ होत असे. या छळाला कंटाळून सदरील महिलेने राहत्या घरी आत्महत्या केली. ही घटना शाहूनगर भागात घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पतीसह सासु विरोधात ३०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पल्लवी विनोद जानवळे (वय २०) या महिलेचा गेल्या वर्षी विवाह झाला होता. लग्नामध्ये ५ लाख रुपये हुंडा राहिल्याने तिचा पती व सासू सातत्याने छळ करत असे. या छळाला कंटाळून महिलेने रात्री आपल्या शाहूनगर भागातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीसांनी पंचनामा केला. आरोपी पती व सासू विरोधात कलम ४९८, ३०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

Advertisement

Advertisement