Advertisement

कॅप्टन कुल धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

प्रजापत्र | Saturday, 15/08/2020
बातमी शेअर करा

मुंबई -भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर १५ ऑगस्टच्या दिवशीच महेंद्र सिंग धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आत्तापर्यंतच्या टीम इंडियाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणून धोनीचा लौकिक आहे. त्याचा हेलिकॉप्टर शॉट असो किंवा त्याने अनेकदा हातातून गेली अशी वाटणारी जिंकलेली मॅच असो धोनीचा खेळ क्रिकेटरसिक कधीही विसरणार नाहीत.
२०१९ विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यानंतर तत्कालीन निवड समितीने धोनीला नंतर स्थान दिलं नाही. संपूर्ण स्पर्धेत धोनीची संथ खेळी ही चर्चेत राहिली होती. २०१९ विश्वचषकानंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करणार होता. परंतु विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्याच्याशी बोलून निवृत्तीचा निर्णय पुढे ढकलायला लावलं. मध्यंतरीच्या काळात संघात ऋषभ पंतची खराब कामगिरी लक्षात घेता धोनीला पुन्हा संघात स्थान द्यावी अशी मागणी होत होती. परंतू धोनीला पुन्हा संघात स्थान मिळालं नाही.

 

Advertisement

Advertisement