परळी-शहरात शनिवारी एका रात्रीत अज्ञात व्यक्तींनी तुळजाई नगर, कृष्णा नगर, गणेशपार आदी भागात आपापल्या घरासमोर लावलेल्या गाड्यांची तोडफोड करत लाखोंचे नुकसान केले आहे.

गाड्यांच्या काचा आणि इतर नुकसान अज्ञात व्यक्तीने केले असल्याने रविवारी सकाळी खळबळ उडाली. विशेष म्हणजे रस्त्याने जात असलेल्या नागरिकांनाही या माथेफिरूने मारहाण केल्याचे बोलले जात आहे.

शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी मोटार सायकलवरून रॉडने आणि दगड - विटांनी गाड्यांच्या काचा फोडून दहशत निर्माण केली असून आज सकाळपासून परळीत भीतीचे वातावरण पसरले आहे.

	        
	         बातमी शेअर करा  
	      	    
	    
  
	    
  
	
      
                                    
                                
                                
                              
