बीड : अपह्रत मुलीच्या शोधासाठी ४० हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी दिंद्रुड पोलीस ठाण्यातील एपीआय अनिल गव्हाणकर याला अखेर निलंबित करण्यात आले आहे. गव्हाणकर याने लाच मागितल्याची ऑडिओक्लिप समोर आल्याने खळबळ माजली होती.
दिंद्रुड पोलीस ठाणे हद्दीत एका मुलीच्या अपहरणाची तक्रार तिच्या नातेवाईकांनी केली होती. मात्र सदर मुलीचा शोध घेण्यासाठी पोलीस ठाणे प्रमुख अनिल गव्हाणकर याने ४० हजाराची मागणी केली होती. यासंदर्भात मुलीच्या नातेवाइकांनी पोलीस अधीक्षकांची भेट देऊन तक्रार केली होती. तसेच संवादाची ऑडिओ क्लिप देखील दिली होती. या प्रकरणात अखेर ३ दिवसांनी एपीआय अनिल गव्हाणकर याला निलंबित करण्यात आले आहे.
बातमी शेअर करा