Advertisement

दारुबंदी विभागातील अधिकारी पन्नास हजारांची लाच घेताना पडकला

प्रजापत्र | Wednesday, 02/06/2021
बातमी शेअर करा

बीड- दाखल गुन्ह्यातील नाव काढण्यासाठी तक्रारदारास लाचेची मागणी केली. पन्नास हजार रुपयांची लाच घेतांना दारुबंदी विभागातील अधिकार्‍यास बुधवारी (दि.) एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई औरंगाबादच्या एसीबी टिमने केली. 

 

दत्तात्रय लक्ष्मण दिंडकर (वय 40 निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग,बीड) असे लाचखोर अधिकार्‍याचे नाव आहे. तक्रारदार यांनी तक्रार दिली की, दाखल गुन्ह्यात मदत करुन गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी दिंडकर यांनी 75 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 50 हजार रुपचे लाच स्विकारताना दत्तात्रय दिंडकर यास राज्य उत्पादन शुल्क विभाग, बीड कार्यालयात पंचासमक्ष रंगेहाथ पकडले.

 

 

  या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ.राहुल खाडे, प्रभारी अप्पर पोलीस अधीक्षक मारुती पंडित, उपअधीक्षक ब्रम्हदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि.विकास घनवट, मिलींद इप्पर, रविंद्र काळे, भुषण देसाई चालक अंमलदार चंद्रकांत शिंदेे यांनी केली. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातील अनेक वर्षानंतरची ही कारवाई आहे.

Advertisement

Advertisement