बीड - पाटोदा तालुक्यातील अंमळनेर प्राथमिक आरोग्य केंद्रात ४५ वर्षाच्या आतील लोकांना एका नर्सने कोरोना लस दिल्याचे समोर आले आहे. याबाबत एका जिल्हा परिषद सदस्याने तक्रार करताच जिल्हा स्तरावरून कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्या या नर्सवर कारवाईची टांगती तलवार आहे.
बीड जिल्ह्यात सध्या कोरोना लसीचा प्रचंड तुटवडा आहे. त्यामुळे सध्या केवळ ४५ वर्षांवरील लोकांना लस दिली जात आहे. असे असतानाही अंमळनेर आरोग्य केंद्रातील एका कंत्राटी नर्सने ओळखीचा दुरुपयोग करत दोघांना लस दिल्याचे समोर आले आहे.याबाबद जिल्हा परिषदचे सदस्य माऊली जरांगे यांनी तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. त्यामुळे या नर्सवर कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
अंमळनेर आरोग्य केंद्रातील प्रकाराबद्दल मी सहा वाजता आपल्याशी बोलेल.
माऊली जरांगे, जिल्हा परिषद सदस्य
तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडून अहवाल मागविला आहे. खात्री आणि चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल.
- डॉ. आर.बी.पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी