Advertisement

आईला शिवीगाळ,मुलाने कोयत्याने तोडला बाप

प्रजापत्र | Tuesday, 25/05/2021
बातमी शेअर करा

 

बीड दि.२५- दारू पिऊन आईला शिवीगाळ करणाऱ्या बापाची कोयत्याने सपासप वार करत मुलाने खून केला. ही खळबळजनक घटना बीड तालुक्यातील पिंपळनेर परिसरात शेतात आज मंगळवार (दि.२५) रोजी सकाळी घडली.पोलिसांनी आरोपी मुलास ताब्यात घेतले असून पुढील तपास करत आहेत. जिल्ह्यात खुनाच्या घटना वाढल्या असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

किसन अंबादास तागड (वय ६० रा.पिंपळनेर ता.बीड) असे मयताचे नाव आहे. किसन हे दारू पिऊन सतत घरी वाद घालायचे घरी शिवीगाळ करायचे.या रागातून मुलगा लहू किसन तागड यांनी शेतात एकटे असल्याचा फायदा घेत कोयत्याने सपासप वार करत खून केला.

मुलानेच बापाचा खून केल्याच्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच उपाधीक्षक संतोष वाळके,पिंपळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि.शरद भुतेकर, फौजदार सानप,सुरवसे वायकर यांनी घटनास्थळी धाव घेतली मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे आरोपी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पिंपळनेर पोलिस ठाण्यात मयताचे भाऊ रोहिदास अंबादास तागड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पिंपळनेर पोलिस करत आहेत.

Advertisement

Advertisement