Advertisement

सीसीसीच्या कामात हलगर्जीपणा, डॉक्टरसह ७ जण कार्यमुक्त

प्रजापत्र | Saturday, 22/05/2021
बातमी शेअर करा

बीड : आष्टी येथील कोरोना केअर सेंटरच्या कामात हलगरजपणा केल्यामुळे एका डॉक्टरसह एएनएम आणि वॉर्डबॉय अशा ७ जणांना तडकाफडकी कार्यमुक्त करण्यात आले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी ही कारवाई केली. 
          बीडचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर. बी. पवार यांनी शनिवारी सकाळी आष्टीच्या सीसीसीला भेट दिली. त्यावेळी रुग्ण परिसरात फिरत असलेले आढळले, तर या ठिकाणी ड्युटीवर असलेले डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी सीसीसीमध्ये न थांबता समोरच्या इमारतीत थांबले होते. त्याशिवाय सीसीसीमधील स्वच्छता आणि इतर बाबींमध्ये मोठ्या प्रमाणावर ढिलाई दिसल्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी. पवार यांनी येथील डॉ. माधुरी पाचारणे यांच्यासह एएनएम आश्विनी पानतावणे,रुपाली काळे आणि वॉर्ड बॉय निखिल वाघुळे,आकाश राऊत,सुमित धोंडे आणि भारत राऊत यांना तडकाफडकी कार्यमुक्त केले असून गुन्हे दाखल का करू नयेत याची नोटीस देखील बजावली आहे. 

 

Advertisement

Advertisement