किराणासह सर्व व्यवसाय राहणार बंद
बीड ; राज्य सरकारने राज्यातील लॉकडाऊनची मुदत १ जून पर्यंत वाढविल्यानंतर आता जिल्हा प्रशासनाने देखील बीड जिल्ह्यात कठोर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता शनिवार (दि. १५ ) च्या मध्यरात्रीपासून ते २५ तारखेपर्यंत जिल्ह्यात कडकडीत बनाड राहणार आहे. या काळात केवळ वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित दुकाने, पेट्रोल पंप सुरु राहणार असून किराणासह इतर सर्व व्यवसाय ११ दिवस बंद राहणार आहेत.
राज्य सरकारने राज्यात १ जून पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला असून स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला दिले आहेत. त्यानुसार बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात १५ ते २५ मे या काळात संपूर्ण लोकं डाउनच निर्णय घेतला आहे. याकाळात केवळ आरोग्याशी संबंधित व्यवसाय , पेट्रोल पंप, गॅस वितरण सुरु राहील , तर दूध विक्री सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत सुरु असेल, बँक केवळ शासकीय आणि पेट्रोल पंप, वैद्यकीय संबंधित व्यवहारासाठी खुल्या असतील . बाकी सर्व व्यवहार १० दिवस पूर्णतः बंद असणार आहेत .
बातमी शेअर करा