Advertisement

कलेक्टर, एसपी, सीईओ रस्त्यावर;निर्बंधांचे पालन करण्याचे केले आवाहन

प्रजापत्र | Thursday, 06/05/2021
बातमी शेअर करा

बीड : जिल्ह्यात कोरोनाचे आकडे वाढत असतानाच गुरुवारी दुपारी बीडचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असे तिन्ही वरिष्ठ अधिकारी थेट रस्त्यावर उतरले. बीड शहराच्या चौकांमध्ये थांबून रस्त्यावर येणाऱ्या वाहनांची आणि व्यक्तींची तपासणी करत त्यांनी जनतेला निर्बंधांचे पालन करण्याचे आवाहन केले. 

बीड जिल्ह्यात बुधवारपासून लॉकडाऊनचे निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत . त्यातच बुधवारी काही ठिकाणी पोलिसांकडून लोकांना मारहाणीचे प्रकार घडले होते . या पार्श्वभूमीवर गुरुवारी दुपारी स्वतः जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, पोलीस अधीक्षक आ. राजा आणि सीईओ अजित कुंभार हे रस्तयावर उतरले. त्यांच्यासोबत तहसीलदार शिरीष वमने होते. सहाराच्या चौकात थांबून प्रशासनातील या तीनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रस्तयावर येणाऱ्या वाहनांची तपासणी केली, रस्त्यावर येणारे लोक अत्यावश्यक कामासाठीच येत आहेत का याचीही खात्री या अधिकाऱ्यांनी केली. 

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा आकडा वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडणे अत्यावशक आहे , त्यासाठी लोकांनी अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे , जे निर्बंध लावले आहेत, ते जनतेच्या आरोग्यासाठीच आहेत, त्यामुळे या निर्बंधांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी जगताप यांच्यासह एसपी आर अर्ज आणि सीईओ अजित कुंभार यांनी केले.

Advertisement

Advertisement