Advertisement

लसीकरणावरुन जिल्हा रुग्णालयात गोंधळ, डीवायएसपींना धक्काबुक्की

प्रजापत्र | Wednesday, 05/05/2021
बातमी शेअर करा

बीड-बीडच्या जिल्हा रुग्णालयात बुधवारी लसीकरणावरुन गोंधळ उडाला, यावेळी गर्दी नियंत्रणाचा प्रयत्न करणाऱ्या बीडच्या पोलीस उपाधिक्षकांनाही धक्काबुक्की झाल्याची माहिती आहे. पोलीसांनी या प्रकरणात तिघांना ताब्यात घेतले आहे. तर आणखी काहींचा पोलीस शोध घेत आहेत.
बीडच्या जिल्हा रुग्णालयात सध्या लसीकरणावरुन रोजच गोंधळ होत आहे. लस कमी पडत असल्याने रोजच गर्दी उसळत आहे. बुधवारी अशीच मोठी गर्दी जिल्हा रुग्णालयात जमली होती. यावेळी गर्दी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करणारे बीडचे पोलीस उपाधिक्षक संतोष वाळके यांना जमावाने धक्काबुक्की केली.यात डीवायएसपी वाळकेंच्या गळयाला जखम झाल्याची माहिती आहे. तसेच जमावाने पोलीस पथकाला शिवीगाळ देखील केली. पोलीसांनी यातील तिघांना ताब्यात घेतले असुन आणखी तिघांचा पोलीस शोध घेत आहेत.

Advertisement

Advertisement