गेवराई-कोरोनासारख्या महामारीला रोखण्यासाठी शहरातील लहान मोठ्या व्यावसायिकांची अँटिजेन चाचणी घेण्यासाठीचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढल्यानंतर बुधवारी (दि.५) गेवराई शहरात सहा ठिकाणी या चाचणीसाठी सेंटर सुरू करण्यात आले. यात सायंकाळपर्यंत ८०५ व्यापाऱ्यांच्या अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या होत्या.यात तब्ब्ल २८ व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून गेवराई शहरासह तालुक्यात विविध भागात कोरोना रोगाचे रूग्ण आढळून आल्याने शहर व परिसरातील विविध भागात ३० जूलै पासून ६ ऑगस्ट पर्यंत पूर्णपणे लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी दि.५ व ६ या दोन दिवसात शहरातील व्यावसायिकांच्या प्रतिजन ( अँटिजेन) चाचणी बाबत आदेश काढले होते. या आदेशानुसार बुधवारी (दि.५) गेवराई शहरात नगरपरिषद कार्यालय, र.भ.अट्टल महाविद्यालय,नगर परिषद हॉल शिवाजी चौक,पंचायत समिती कार्यालय व कन्या प्रशाला आशा एकूण सहा ठिकाणी या तपासणीसाठी सेंटर नियुक्त करून तपासण्या सुरू करण्यात आल्या असून यात ८०५ व्यापाऱ्यांचे घेण्यात आले होते. या कामी तहसीलदार प्रशांत जाधवर,तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय कदम, उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉक्टर राजेश शिंदे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे, पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम चौबे यांच्यासह न.प. कर्मचारी, आरोग्य विभागाच्या सर्व अधिकारी कर्मचार्यांनी सहभाग नोंदवत परिश्रम घेत आहेत.
प्रजापत्र | Wednesday, 05/08/2020
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा