Advertisement

दुपारी येणार ९०० रेमडीसेविर

प्रजापत्र | Thursday, 22/04/2021
बातमी शेअर करा

बीड : मागील आठवडाभरापासून पाठपुरावा सुरु असलेले तब्बल ९०० रेमडीसेविर इंजेक्शन अखेर येत्या दोन तीन तासात बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे उपलब्ध होणार आहेत. जालना येथून सदर इंजेक्शन बीडसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिली.

 

बीड जिल्ह्यातील रेमडीसेविर  तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर अनेक ठिकाणी इंजेक्शन उप्लब्धतेसाठी पाठपुरावा करीत होते. मात्र अनेक तांत्रिक अडचणीत बीडचा इंजेक्शन पुरवठा अडकला होता.

 

आता अखेर यातील सर्व अडचणी दूर झाल्या असून आज दुपारी १२ नंतर तब्ब्ल ९०० इंजेक्शन बीड जिल्ह्यासाठी उपलब्ध होणार आहेत. हे इंजेक्शन बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे येणार असून नंतर नियमाप्रमाणे त्याचे वितरण होईल अशी माहिती माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिली. आपण आणखीही इंजेक्शन मिळविण्यासाठी अनेकांच्या संपर्कात असून लवकरच जिल्ह्याला आणखी इंजेक्शन मिळतील असेही जयदत्त क्षीरसागर म्हणाले. 

Advertisement

Advertisement