माजलगाव- येथील दोन सीसीसी सेन्टर मध्ये विद्युत पुरवठा खंडित झाल्याने या दोन सीसीसी केंद्रात सोमवारी रात्री अंधाराचा सामना उपचाराधिन रुग्णांना करावा लागला.
गेल्या काही दिवसात कोव्हिड रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे रुग्णाला बेड उपलब्ध व्हावेत म्हणून आरोग्य विभागाच्या वतीने शहरालगत असलेल्या दोन मंगलकार्यालयात सीसीसी केंद्राची उभारणी केली आहे या दोन्ही सीसीसी मध्ये बेड ची क्षमता हि २५० रुग्णाची आहे माउली लौन्स आणि व्यंकटेश लौन्स या दोन्ही मंगलकार्यालयात अनेक कोव्हिड रुग्णावर उपचार सुरु आहेत परंतु सोमवारी रात्री वेळी याठिकाचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने रुग्णांना अंधाराचा सामना करावा लागला.
आरोग्य विभागाच्या वतीने विद्युत वितरण कंपनी ला सदरील केंद्रावर २४ तास विद्युत पुरवठा व्हावा या साठी कळवण्यात आले आहे परंतु असे असताना देखील या दोन्ही केंद्रावर विद्युत पुरवठा हा खंडित झाला होता यातून उपचाराधिन रुग्णातून नाराजी व्यक्त होत आहे.शहराच्या बाहेर हे सीसीसी केंद्र असून रुग्णाच्या बाबतीत असुविधेमुळे नातेवाईकात नाराजी व्यक्त होत आहे.