बीड- बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या रेमडेसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा लक्षात घेऊन माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी पाठपुरावा करून 10 जिल्ह्यासाठी 10 हजार इंजेक्शनचा पुरवठा करण्याची आग्रही मागणी केली होती. त्यानुसार मायलाँन कंपनीच्या इंजेक्शन चा पुरवठा उद्या रात्री उशिरापर्यंत केला जाणार आहे. मुंबईत झालेल्या गोंधळामुळे हा पुरवठा ४८ तास उशिरा होत आहे अन्यथा हे इंजेक्शन आजच मिळणार होते. यातील एक हजार इंजेक्शन बीड जिल्हयासाठी आहेत.
गेल्या दोन दिवसापासून राज्यात सुरु असलेल्या रेमडेसिव्हर इंजेक्शनच्या पुरवठ्यात व्यत्यय आल्याने सोमवारी मिळणारे इंजेक्शन प्राप्त झाले नाही त्यामुळे आज पुन्हा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी पुन्हा पाठपुरावा करून मराठवाड्यातील जिल्ह्यात इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केली तेव्हा बेंगलोर येथील मायलॉन कंपनीच्या 10000 रेमडेसिव्हर इंजेक्शनचा पुरवठा तातडीने केला जाईल असे सांगण्यात आले त्यामुळे उद्या रात्री उशिरापर्यंत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यासाठी तर नगर आणि बुलढाणा या दोन जिल्ह्यासाठी प्रत्येकी एक हजार प्रमाणे 10 हजार इंजेक्शन उपलब्ध होणार आहेत यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जालना जिल्हाधिकारी यांना तात्काळ संपर्क साधून हे इंजेक्शन उद्या मुंबई येथे येणार असून ते तातडीने जालन्याला पाठवत असल्याचे सांगितले जालना येथून मराठवाड्यातील आठ जिल्ह्यासाठी व अन्य दोन जिल्ह्यासाठी प्रत्येकी 1 हजार रेमडेसिव्हर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात येणार आहे.त्यामुळे कोरोना रूग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे