बीड: वाळु व्यापाऱ्यांकडून लाच घेताना पकडण्यात आलेल्या उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांना अखेर शासन सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. माजलगावचे उपविभागीय अधिकारी असलेल्या श्रीकांत गायकवाड यांना १९ फेब्रुवारी रोजी लाच घेताना जालना एसीबीच्या पथकाने पकडले होते.
माजलगावचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड यांच्या निवासस्थानी त्यांच्यासह त्यांच्या चालकाला वाळु व्यापाऱ्यांकडून लाच घेतना १९ फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती. विशेष म्हणजे सदर कारवाई बीडऐवजी जालना एसीबीने केली होती. थेट उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी जाळयात अडकल्याने राज्यात हा विषय चर्चेचा झाला होता. श्रीकांत गायकवाड यांना सुरुवातीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती आणि त्यानंतर ते न्यायालयीन कोठडीत होते. माजलगावच्या सत्र न्यायालयाने त्यांचा जामिन अर्जही फेटाळला होता.
या पार्श्वभूमीवर आता राज्यशासनाने गायकवाड यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.