Advertisement

पोलिसांनी लाठीचार्ज केला तर....

प्रजापत्र | Friday, 26/03/2021
बातमी शेअर करा

बीड-आजपासून बीड जिल्ह्यात दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर झाला असून या लॉकडाऊनला  जिल्हाभरातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.शुक्रवारी (दि.२६) आष्टीत आ.सुरेश धस,व्यापारी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक पार पडली.या बैठकीत व्यापाऱ्यांनी प्रशासनासमोर तीन पर्याय ठेवले होते.पहिला पर्याय म्हणजे लॉकडाऊन मागे घ्या,दुसरा पर्याय दुकाने बंद ठेवण्याची वेळ दुपारी १ पर्यंत वाढवा आणि तिसरा पर्याय म्हणजे आहे त्या वेळेत आम्ही दुकाने उघडतो मात्र लॉकडाऊन तीन दिवसांत संपवा अशी चर्चा झाली.मात्र यावर प्रशासनाकडून अद्याप कोणतेही भूमिका जाहीर करण्यात आली नाही. यानंतर आ.सुरेश धस यांनी लाईव्ह येत पोलीस प्रशासनाला इशारा देताना 'पोलिसांनी कोणावरही लाठीचार्ज करू नये जर कुठे लाठीचार्ज झाला त्याचे कुठे व्हिडिओ प्राप्त झाले तर..... लाठीचार्जसाठी कमिशनरपर्यंत नंतर जावे लागेल' असा इशारा ही त्यांनी दिला आहे.  

 

व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकला क्लिक करा... 

https://youtu.be/Pg6Xgpo704U  

 

Advertisement

Advertisement