बीड- जिल्ह्यात लॉकडाऊन झाले तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात आत्महत्या करू असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवराज बांगर यांनी दिला होता, लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत घोषणाबाजी सुरू केली होती, याच दरम्यान त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी आज (दि.२४)पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी जिल्ह्यात दहा दिवसाचा लॉकडाऊन असेल अशी घोषणा करतात,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवराज बांगर, समाजसेवक मोहन जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन सुरू करत लोकांचा निर्णय मागे घेण्याची मागणी करत लॉकडाउनचा निर्णय मागे घेण्याची घोषणाबाजी सुरू केली होती. याच वेळी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
बातमी शेअर करा