लिंबागणेशः प्राथमिक आरोग्य केद्रातिल एका आरोग्य सहाय्यकाचा कोरोना अहवाल पाँझिटिव्ह आल्याने लिंबागणेशच्या प्राथमिक आरोग्य केंद्रालाच कुलूप लावण्यात आले असल्याची माहिती आहे. एखादे प्राथमिक आरोग्यकेंद्रच बंद करण्याची वेळ जिल्ह्यात प्रथमच आली आहे.
२३ जुलै रोजी पाठविलेल्या अहवालात २४ जुलै रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र लिंबागणेश येथिल आरोग्य सहाय्यक बाधित आढळून आला आहे.
त्यामुळे आज सकाळी ११:४० वा. स्वाब तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी यांना बीडला बोलावून घेतले आहे.
बाधित आरोग्य सहाय्यकांकडे त्यांचे प्राथमिक आरोग्य केंद्र लिंबागणेश अंतर्गत सर्व गावांमध्ये पर्यवेक्षण करण्याचे काम होते. त्यांना बाहेर जिल्ह्यातील आलेल्या लोकांना भेटून आरोग्य विषयक जनजागृती, त्याचे अहवाल जिल्हा प्रशासनाला देणे, नियमित लसीकरण करणे आदि.कामे करण्यात येत होती. ते बीड येथे स्थायिक असून येणे जाणे करत होते.
दरम्यान या अहवालानंतर लिंबागणेश आरोग्य केंद्र आरोग्यसेवेसाठी बंद करण्यात आले आहे.
प्रजापत्र | Friday, 24/07/2020
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा