बीड-जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची वाढ सातत्याने होत असून गुरुवारी (दि. 23) रात्री 16 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
बीड जिल्हयात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर सुरु असून नवीन रुग्णांची वाढ थांबण्याचे चिन्हे दिसत नाहीयेत.गुरुवारी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बीडमधील पाच जण आहेत.ज्यामध्ये
सावतामाळी चौक 1,
माळी गल्ली 1,
वीर शिव कॉलनी पेठ बीड 1,
आनंद नगर 1,
फुलाई नगर 1 यांचा समावेश आहे.
तर परळीत सहा जण पॉझिटिव्ह आले असून धर्मापुरी (ता. परळी) तील पाच आणि पद्मावती कॉलनीमधील एक जण सापडला आहे. तर अंबाजोगाईत दोन ज्यामध्ये गौड गल्ली आणि पळस निवास येथील रुग्ण आहेत.
तसेच गेवराईतही दोघे आढळले असून यात
रंगार चौक आणि तहसील रोडवरील रुग्णाचा समावेश आहे यासोबतच धारूरच्या अयोध्या नगर मध्येही एक जण आढळला आहे.
बातमी शेअर करा