अंबाजोगाई-शहरात एकाच वेळी कोरोनाचे सात रूग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या रूग्णांमध्ये हाऊसिंग सोसायटीतील ९० वर्षीय वृद्ध व्यक्तीचा समावेश होता. या व्यक्तीचा आज गुरूवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास कोरोनामुळे मृत्यू झाला.
या व्यक्तीस दोन दिवसापूर्वी प्रकृती अस्वास्थ्यामुळे स्वाराती रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांचा थ्रोट स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविला असता त्याचा अहवाल पाॅझिटीव्ह आला. अहवाल आल्यानंतर अवघ्या तासाभरात त्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
बातमी शेअर करा